Sunday, 11 August 2013

मी मराठी आहे कारण.........

मी मराठी आहे कारण घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी
वरणभात साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.

मी मराठी आहे कारण कितीही Branded Perfumes वापरले तरी
उटण्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही

मी मराठी आहे कारण गाडीतून जाताना जिकडे मंदिर
दिसेल तिकडे नकळत हात जोडले जातात.

माझ्यातला मराठीपण जोपासण्याची मला गरज नाही.
तो माझ्या रक्तात भिनलाय आणि याचा मला अभिमान आहे.

No comments:

Post a comment