Pages

Sunday, 11 August 2013

Motivational stories

एकदा एक १० वर्षाचा मुलगा आईस्क्रीमच्या दुकानात गेला.
तो टेबलाजवळ बसला आणि त्याने वेटरला विचारलं, "आईस्क्रीम कोनकेवढ्याला आहे?"
वेटर म्हणाला, "५ रुपये".
तो मुलगा हातातील नाणी मोजू लागला.
नंतर त्याने आईस्क्रीमचा लहान कप केवढ्याला, असं विचारलं.
वेटरने ञासिकपणे उत्तर दिलं, "४ रूपये."
तो मुलगा म्हणाला मला आईस्क्रीमचा लहान कप द्या.
त्या मुलाने आईस्क्रीम खाल्लं, बिल दिलं आणि तो गेला.
वेटर त्याचा रिकामा कप उचलायला गेला आणि त्याला जे दिसलं त्याने त्याचं मन हेलावून गेलं.
कपाजवळ १रुपया त्याने टीप म्हणून ठेवला होता.
आईस्क्रीमची ऑर्डर देण्यापूर्वी त्या लहान मुलाने त्या वेटरचा विचार केला होता.
त्या मुलाने संवेदनक्षमता आणि कदर करण्याची वृत्ती दाखवली होती.
स्वतःचा विचार करण्यापूर्वी त्याने इतरांचा विचार केला होता.
मी प्रत्येक वेळी नाही म्हणतं पण कधीतरी दुसऱ्‍यांचा विचार करावा.
सर्वजण एकसारखे नसतात.
ते आपापल्या परिस्थितीनुसार असतात......

No comments:

Post a Comment