Pages

Showing posts with label Life poems. Show all posts
Showing posts with label Life poems. Show all posts

Friday, 16 August 2013

Fackbook varcha prem jara veglach asta...

Fackbook varcha prem jara veglach asta... 
kwachitach khara pan nehmi online asta... 
Tichya pratek status la tyacha like asta... 
Tyacha pratek photot tich tag aste... 
Sadasarva kal ekmekanchi profile pahnachaluch asta...
 Kuthalahi message ala tari manat hurhurat asta... 
Karan nastana ugich kuni"hii....hello"mhanat asta... 
Kahi mojke mahine dogacha hirve signal chalu asta... 
Mag konalahi navin friend requst ali aste... 
Ikadcha chating visarun tithe video calling suru asta...
 Ikadchya profile la te umjayla lagta... 
Manachya krodala mag block the person shivay option nasta... 
Facebook varcha prem tasa jara veglach asta...!!!! - 
Facebook love

प्रेम कसं असतं?......

प्रेम कसं असतं?
किती हटलीस एकदा म्हणत
कि मला प्रेम खरच,कळतं का?
त्यावर मी म्हंटल ठीक आहे
पाहूया,मला वळतं का;
तू म्हणालीस,सांग ना प्रेम हे कसं असतं?
मी म्हणालो प्रेम असं असतं.........
प्रेम हे करणारं नसतं,ते नकळत होणारं
असतं,
एक चंदनित गंध,जे हलकं हलकं दरवळणारं
असतं;
ते पुष्प जे,गजरी गोवणारं असतं,
मोगर्याचं फुल,जे वेणीत खोवणारं असतं;
एक रंगीत महेनत,जिच्यात रात्रंदिवस
राबणारं असतं,
एक दवित थेंब,ज्याच्यात खोलवर डुबणारं
असतं;
वाळूच्या कणाप्रमाणे,कधी हातून
निसटणारं असतं,
श्रावणाची पहिली सर,जिच्यात चिंब
भिजणारं असतं;
टप्पोरी गुलाब
कळी,जिच्या काट्यातही गझलणारं असतं,
प्रेयसीच्या उबेत आठवूनच,गरमणारं असतं;
उमद्या रंगीत तारुण्यात,कधी निष्पाप
बालकणारं असतं,
शृंगारीत मादक्तेत
रंगूनही,कधी पालकणारं असतं;
विरहातही तुझ्या मिठीत लपणारं असतं,
कंठी ताईता प्रमाणे,तुला आजन्म जपणारं
असतं;
कधी रुसल्या तुला,अलगद गुगुदावून
खुलवणारं असतं,
चांदण्या रात्री,चंद्र नाहात झुल्यावर
झुलणारं असतं;
कधी थकून लाडात,तुझ्या मांडी निजणारं
असतं,
प्रणयीत ज्योती असूनही,रोज
रात्री विझणारं असतं;
कधी मुद्दाम पाठी लागून
तुला चिडवणारं असतं,
मुठीतला गजरा द्यालायला,
तुला अडवणारं असतं;
मागून वेढांवून तुझ्या मानेवर नाक
घासणारं असतं,
धुंदावून
टाकणाऱ्या वेणीतल्या फुलाला वासणारं
असतं;
अजून गं काय सांगू,प्रेम हे मदनीत पोरकट
असूनही भारदस्त असतं,
ऐकत गाढ
निजलेल्या माझ्या छातीवर,तुझ्याच
सारखं निर्धास्त असतं.

Prem Kavita
Add caption

Sunday, 11 August 2013

तुझी आठवण आली की.....

तुझी आठवण आली की,
मला माझीचं खुप चिड येते..
संपले ना सर्व तुझ्याकडुन,
मग
का मी असा स्वःताला त्रास देते..
नको त्या खोट्या शपथा,
नको त्या सुखद आठवणी..
आठवुण सर्व काय करु,
मग
डोळ्यात माझ्या येतं पाणी..
आठवणीँनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला इतरांपासून लपवू कशी..
भरभरुन वाहणाऱ्या अश्रुंना थोपवून,
खोटे हसु आणू तरी कशी..
ते अश्रूं लपवण्याच्या प्रयत्नांत,
मग
मी तुलाचं दोष देत राहते..
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनचं आठवत राहते..

बघ माझी आठवण येते का ????.....

मुसळधार पाऊस......
ऑफिसच्या खिडकित उभी राहून पहा...
बघ माझी आठवण येते का॥
हात लांबव तळहातावर घे पिसीचे कीबोर्ड।
इवलासा मेल वाचून बघ...
बघ माझी आठवण येते का????

वाऱ्याने उडनारे फाईल मधले पेपर्स सांभाळुन ठेव।
डोळे मिटुन घे।तल्लीन हो.
नाहीच आठवल काही तर मेल चेक कर।
इनबॉक्स वर ये।तो भरलेला असेलच.
मग वाचू लाग।
माझे कंटाळवाणे फ़ॉरवर्ड वाचुन घे।
वाचत राहा मेल संपेपर्यंत।
तो संपनार नाहीच।
शेवटी मेल बंद कर।डिलीट करु नकोस.
फ़ॉरवर्ड करु नकोस।
पुन्हा त्याच इनबॉक्स वर ये।
आता दुसऱ्या मेलची वाट बघ।
बघ माझी आठवण येते का???।

घड्याळात पाच वाजतील।
तुला निघायची घाई असेल।
तितक्यात एक मेल येईल।
तू तो इच्छा नसतानाही उघडून बघ।
तो विचारील तुला मेल न करण्याचे कारण।
तु म्हण सर्व्हर डाऊन होता।
मग थोडे मेल फ़ॉरवर्ड कर॥तुही वाच।
तो पुन्हा फॉरवर्ड करेल।
तू तो डीलीट कर।
एखादी कविता वाच।
बघ माझी आठवण येते का???

मग निघायची वेळ होईल।
तरी पुन्हा मेल येईल।
तो म्हणेल काळजी घे स्व:ताची॥,
मग तुही तसेच लिही।
मेल मागून मेल येतील।
फॉरवर्ड मागुन फॉरवर्ड होतील।
शेवटी सगळे डीलीट कर।
आता रिकाम्या इनबॉक्स कडे बघ।
बघ माझी आठवण येते का॥????

यानंतर लॉग आऊट व्हायला विसरु नकोस।
या नंतर पिसी बंद करण्याचा प्रयत्न कर।
या नंतर...ऑफिस मधुन बाहेर ये।
घरी लवकर जाण्याचा प्रयत्न कर।
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी.... मेल करताना...
बघ माझी आठवण येते का???

तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं.......

तुही माझ्या प्रेमात
पडताना असं
काही पडावं,
स्वप्नातल्या स्वप्नातही तुला
फक्त माझंच स्वप्न पडावं,
गर्दीतही तूला माझ्याविना
एकटेपणाने छळावं,
तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप
खूप रडावं.
कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच
शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं
चित्र रेखाटावं,
पूर्ण
होऊनही चित्र...तुला ते
अर्धवटच वाटावं..
मरणही असं.....
तुज्या मिठीत
यावं,
कि मरणानंतर हि ते मरण
मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं
असं भरावं,
कि दु:खाला पण
माज्या आयुष्यात येताना
कोडं पडावं.

अस्सल मराठी .........


गॉगल मध्ये नाही छानदिसला
तरी जो फेट्यावर छानदिसतो,
तो खरा मराठी मुलगा असतो....!
"Hi Dude","whats up" न
बोलता,
जो "मित्रा" अशी हाक
मारतो,
तो खरा मराठी मुलगा असतो...!
त्याने
टवाळेगिरी कितीही करो पण
जो मंदिरात
नक्की हात जोडतो,
"आई-बहिणी" वरून
कुणी गेला तर
जो समोरच्याची हाडं
तोडतो,
तो खरा मराठी मुलगा असतो....!
इंग्रजी भले तो हळू आवाजात
बोलतो,
पण"शिवाजी महाराज
कि जय"हे कणखरपणे
जोरजोरात
बोलतो,
तो खरा मराठी मुलगा असतो...!
मुलगी जरी जीन्समधली आवडली,
तरी आई वडिलांसमोर
जो तिला साडीमध्ये
नेतो,
तो खरा मराठी मुलगा असतो...........

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरती बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

कोणी गेलं म्हणून,

कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...

आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...

आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...

कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...

दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे.
त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...

तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...