Pages

Wednesday, 4 September 2013

Marathi cha jastit jast vapar kara

इंग्रजीच्या नादापाई, मराठीचा डब्बा गोल ।। मराठी माणसा, आता तरी मराठीत बोल ।। इंग्रजीच्या पेपरात होतो वर्ग सारा पास ।। पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास ।। प्रेम करतो म्हटलं की पोरगी समजते शेंबड्या ।। अन आय लव यू म्हटल्यावर मनात मारते उड्या ।। माय झाली मॉम आणि बाप झाला डँड।। रेव्ह पार्टीत नाचून पोर झाली मॅड ।। भांडण करते बायको धरते एकच हेका ।। कायबी झालं तरी चालंल पोरगं इंग्लीश शाळंत टाका ।। मराठी माणसापासूनच आहे खरा मराठीला धोका ।। शाळेला मिळत नाही मराठीचा शिक्षक, मराठी माणूसच आहे मराठीचा भक्षक ।। तुकोबाची अभंगवाणी, आन् मराठीचा गोडवा।। मराठी माणसाचे नववर्ष असतो गुढीपाडवा ।। सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली ।। भाषा रक्षणासाठी बोला मायबोली ।। मुंबईला म्हणतो बॉम्बे, अन मद्रासला मात्र चेन्नाई, कॉस्मोपोलिटन बनण्याची आम्हालाच जणू घाई ! डोके आहे शाबूत का झाला आहे खोका? मराठी माणसापासूनच मराठीला आहे धोका ! ।। मी मराठी ।।

No comments:

Post a Comment