Pages

Friday, 6 September 2013

किती दिवस सहन करणार

किती दिवस सहन करणार ? किती दिवस
दबून राहणार ? चेन्नई , बंगळुरू , कोलकाता
सगळीकडे जर दुकानच्या पाट्या स्थानिक
भाषेत असतात तर महाराष्ट्रात का नाही ?
आमचे सरकार झोप का काढत आहे ?
त्यांना वेळ नाही !!! आणि पडलेली नाही ...
मराठी माणसानी कुणकडे बघायच ? आम्ही
काय झक मारली आहे ! हे उत्तर
भारतीया का आले महाराष्ट्रात ? कारण बिहार
आणि उत्तर प्रदेशात आहे काय ?
गुंडगीरी आणि अशिक्षित लोक ...
जया भादुरी इतका पूळका आहे यूपी चा तर तिथेच
का नाही राहत ? कारण
मराठी माणसानी ह्याना समऊन घेतल ... आपल
केल ... मराठी लोक शांत आहेत ... विचारी आहेत ...
म्हणून काय मुळापासून उस खायचा ?
आणि आता हेच लोक आपल्या डोक्यावर
बसायला लागले आहेत !!!

Wednesday, 4 September 2013

Marathi cha jastit jast vapar kara

इंग्रजीच्या नादापाई, मराठीचा डब्बा गोल ।। मराठी माणसा, आता तरी मराठीत बोल ।। इंग्रजीच्या पेपरात होतो वर्ग सारा पास ।। पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास ।। प्रेम करतो म्हटलं की पोरगी समजते शेंबड्या ।। अन आय लव यू म्हटल्यावर मनात मारते उड्या ।। माय झाली मॉम आणि बाप झाला डँड।। रेव्ह पार्टीत नाचून पोर झाली मॅड ।। भांडण करते बायको धरते एकच हेका ।। कायबी झालं तरी चालंल पोरगं इंग्लीश शाळंत टाका ।। मराठी माणसापासूनच आहे खरा मराठीला धोका ।। शाळेला मिळत नाही मराठीचा शिक्षक, मराठी माणूसच आहे मराठीचा भक्षक ।। तुकोबाची अभंगवाणी, आन् मराठीचा गोडवा।। मराठी माणसाचे नववर्ष असतो गुढीपाडवा ।। सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली ।। भाषा रक्षणासाठी बोला मायबोली ।। मुंबईला म्हणतो बॉम्बे, अन मद्रासला मात्र चेन्नाई, कॉस्मोपोलिटन बनण्याची आम्हालाच जणू घाई ! डोके आहे शाबूत का झाला आहे खोका? मराठी माणसापासूनच मराठीला आहे धोका ! ।। मी मराठी ।।

Tuesday, 27 August 2013

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला....................

वाचून शेअर कराच 

*.परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला.*

*."दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला.*

*."उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला".*

*.मी म्हटले"सोडून दे, आराम करू दे त्याला".*

*."तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?.*

*.मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?".*

*."मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक.*

*.तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.*

*."इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.*

*.भक्तांना खुश करेपर्यत खूप खूप दमतो".*

*."काय करू आता माझ्याने manage होत नाही.*

*.पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत".*

*."immigration च्या requests ने system झालीये hang.*

*.तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग".*

*."चार-आठ आणे देऊन काय काय मागतात.*

*.माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात".*

*."माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation.*

*.management च्या theory मध्ये मिळेल तुला solution".*

*."M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे.?.*

*.Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे.?".*

*."असं कर बाप्पा एक Call Center टाक.*

*.तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक".*

*."बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको.*

*.परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको".*

*.माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाल.ा*

*."एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला".*

*."CEO ची position, Townhouse ची ownership.*

*.immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship".*

*.मी हसलो उगाच,"म्हटलं खरंच देशील का सांग.?".*

*.अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग.?.*

*."पारिजातकाच्य ा सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं.*

*.सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं".*

*."हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव.*

*.प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव".*

*."देशील आणून मला माझी हरवलेली नाती.?.*

*.नेशील मला परत जिथे आहे माझी माती.?".*

*."इंग्रजाळलेल् या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं.*

*.आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं.?".*

*."कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गजर.*

*.भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार".*

*."यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान.*

*.देशील का रे देवा, यातलं एक तरी दान.?".*

*."तथास्तु"म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला सारं हाताबाहेर गेलंय
पोरा,"सुखी रहा"म्हणाला. . . . .

शेअर कराच 


Thursday, 22 August 2013